नाशिक : पुण्यात गोल्ड मॅनची क्रेज दिसून आली होती. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजले हे गोल्ड मॅन म्हणून परिचीत होते. आता तर नाशिक येथे मराठा आरक्षणासाठी चक्क गोल्ड मॅन उपोषणाला बसलेले पाहायला मिळालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजाला शिक्षणात आरक्षण द्यावे आणि आरक्षणावरील बंदी  उठवावी, यासाठी भारतीय मराठा संघाच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या या उपोषणात घोषणाबाजी करण्यात आली.



हे उपोषण भांडूपचे शिवसेना पदाधिकारी अनुप स्वरूप यांच्यामुळे जास्तच चर्चेत आलेय. कारण आहे त्यांच्या अंगावरील सोने. त्यांनी शेकडो तोळे सोने गळ्यात आणि हातात परिधान केले. ते बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.