जळगाव : जळगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने ४३ डिग्री अंश सेल्सियसचा पारा गाठल्यानं चैत्र महिन्यात वैशाख वणवा पेटल्याची स्थिति आहे, मार्च हिटचा प्रचंड तडाखा जाणवायला लागला  आहे. 


 जळगाव सह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पारा आज ४३ अंशावर पोहचलाय, अंगाची लाही लाही करून सोडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिकांना दुपारी बाहेर पडणे जिकरीचे झालंय. तर सध्या अवघ्या मराठवाड्यात उष्णतेची लाट पसरलेली असतानाच जालन्यात देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला दिसून येतोय.
 
 गेल्या दोन दिवसांपासून जालन्यासह इतर तालुक्यात तापमानाने उच्चांक गाठलाय.काल ४० डिग्री सिल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानंतर आज ४१ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.जालना शहरासह ग्रामीण भागात देखिल उन्हाच्या कडाक्यामुळे नागरीक हवालदिल झालेत.