पुणे : धायरीत नवविवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलीय. गळा चिरून आणि दोन्ही हात कापून हत्या करण्यात आलीय.  पूजा स्वप्नील भडवळे असं या मयत तरुणीचं नाव आहे.


24 वर्ष वय असलेल्या य़ा विवाहितेचे हात कोपरापासून कापलेले आहेत. सहा महिन्यांपूर्वीज पूजाचं लग्न झालं होते. याप्रकरणी पूजाच्या नव-याला ताब्यात घेण्यात आलंय. चारित्र्याच्या संशयावरून पूजाची हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे.