पंढरपूर : जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पंढरपूरचे वीरपुत्र मेजर कुणाल गोसावी मोठ्या शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणाल गोसावी अमर रहेच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली होती. मेजर कुणाल यांच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीनंच मुखाग्नी दिला. हे दृष्य साऱ्यांचंच मन होलावून टाकणारं होतं. मेजर कुणाल यांना निरोप देण्यासाठी वाखरीत हजारोंची गर्दी लोटली होती. 


भारतमातेसाठी आपल्या प्राण्यांची आहुती देणाऱ्या कुणाल यांच्यावर त्यांच्या वाखरीतल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबियांच्या एका डोळ्यात दुखाचे अश्रू असले तरी दुसऱ्या डोळ्यात अभिमानाचीही भावना होती.


मेजर कुणारगीर गोसावी यांच्या हौतात्म्यामुळे संपूर्ण सोलापूरसह पंढरपूरवर शोककळा पसरलीय. गोसावी यांना श्रध्दाजंली वाहण्याकरता पंढरपुरात ठिकठिकाणी होर्डिंग उभारण्यात आलीत. दहशदवादाचा निषेध म्हणून संपूर्ण पंढरपुरात बंद पाळण्यात आला आहे.