`मास्क बुबी` दुर्मिळ पक्षी कल्याणमध्ये सापडला
शहरात अवचितपणे एक अत्यंत दुर्मिळ असा पक्षी सापडला आहे. मास्क बुबी असं त्याचं नाव आहे.
कल्याण : शहरात अवचितपणे एक अत्यंत दुर्मिळ असा पक्षी सापडला आहे. मास्क बुबी असं त्याचं नाव आहे.
मराठीत त्याला समुद्री कावळा असे म्हटले जाते. अत्यंत दुर्मिळ असा हा पक्षी समुद्राच्या आत ८ ते १० किमी अंतरावर राहतो. हिंदी महासागरात त्याचं वास्तव्य दिसून येतं. पावसाळ्यात समुद्रात जोरदार वारे वाहू लागले की अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर तो आपलं बस्तान हलवतो. मात्र समुद्रातच राहतो.
मात्र आज तो समुद्र किना-यापासून ५० किमी आत कल्याणमध्ये जखमी अवस्थेत सापडला. त्यामुळे पक्षीतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. नेवाळी भागातल्या एका ग्रामस्थाने हा पक्षी तज्ज्ञांकडे आणून दिला. सध्या आधारवाडी अग्निशमन कार्यालयात त्याची निगा राखली जात आहे. तो लवकरच त्याच्या मूळ स्थानी समुद्रात सोडण्यात येणार आहे.