अलिबाग : माथेरानची रेल्वे सेवा नादुरुस्त इंजिनामुळे सातत्याने खोळंबत असते, यासाठी उपाय म्हणून माथेरान रेल्वेसाठी नवीन रेल्वे इंजिन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे मंत्रालयाने यासाठी जर ६ नवीन इंजिन पुरवण्यास मान्यता दिली, तर त्यासाठी लागणारा ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी राज्यसरकारने दाखवली आहे, मुख्यमंत्र्यांनी तसं पत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना लिहिलं आहे. 


नादुरुस्त इंजिनामुळे नेरळ ते माथेरान हे २१ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी रेल्वेला अडीच ते चार तासांचा कालावधी लागतो आहे. याचा विपरीत परिणाम माथेरानच्या पर्यटन उद्योगावर होत आहे. 


माथेरानची रेल्वे ही येथील जीवनवाहिनी आहे. माथेरानचे अर्थकारण या रेल्वेवर अवलंबून आहे. रेल्वेच्या आकर्षणामुळेच देशाविदेशातील जवळपास १० लाख पर्यटक भेट देत असतात. मात्र इंजिनातील बिघाडामुळे ही रेल्वे सेवा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पर्यटकांना पायपीट करावी लागते आहे.