वादग्रस्त मयूर शिंदेचा सेनेला रामराम, भाजपमध्ये प्रवेश
मोक्का आणि एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे असलेल्या मयूर शिंदेनं शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केलाय.
ठाणे : मोक्का आणि एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे असलेल्या मयूर शिंदेनं शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केलाय.
भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मयूरने भाजपमध्ये प्रवेश केलाय. मयूरवर पोलीस निरीक्षक प्रेमनाथ थोटम यांना मारहाण करणे, गोळीबार, खंडणी, ठार मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल आहेत.
मयूरसोबत अखिल भारतीय सेनेचा शहर चिटणीस भारत पवार यानेही भाजपमध्ये प्रवेश केलाय.. त्यामुळे निवडणुकाच्या तोंडावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना पावन करुन घेण्याचा सिलसिला भाजपमध्ये सुरु असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.