रत्नागिरीत एसटी डेपो पेटवण्याचा प्रयत्न
माळ नाका येथे एसटी डेपो पेटवून देण्याचा प्रयत्न
रत्नागिरी : माळ नाका येथे एसटी डेपो पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यशवंत रामागडे याने केला रॉकेल टाकून एसटी डेपो पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.
एसटी कर्मच्याऱ्यांनी रामागडेला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने एका कर्मचाऱ्याचा हात देखील चावला. रत्नागिरी शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे.
यशवंत रामागडेवर एसटीच्या रोकड आणि टिकीट विभागाला आग लावण्याचा आरोप आहे. 6 एप्रिलला रामागडेला शहर पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता.