राज्यातील पहिला कमी मतांनी झाला नगराध्यक्ष
राज्यातील यंदाची सर्वात चुरशीची नगराध्यक्षपदाची निवडणूक रोह्यात पाहायला मिळाली आहे.
रोहा : राज्यातील यंदाची सर्वात चुरशीची नगराध्यक्षपदाची निवडणूक रोह्यात पाहायला मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पोटफोडे अवघ्या 6 मतांनी विजयी झाले असून राज्यात या विजयाची चर्चा आहे. त्यामुळे आता अपक्ष समीर शेडगे यांनी केली फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
संतोष पोटफोडे 4354 आणि समीर शेडगे 4348 मते पडली. दोघांमध्ये फक्त सहा मतांचा फरक आहे.
तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये इब्राहीम देशमुख ४ मतांनी निवडून आले आहेत. मनमाडमधील कैलास गवळी १३ तर दिलीप भाबड ११ मतांनी विजयी झाले आहेत.