बच्चू कडू यांनी सचिनला म्हटलं `कबूतर`
`आसूड यात्रा` काढणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी हेमामालिनी यांच्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी अपशब्द काढलेत.
अहमदनगर : 'आसूड यात्रा' काढणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी हेमामालिनी यांच्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी अपशब्द काढलेत.
बच्चू कडू यांनी सचिनचा उल्लेख 'कबूतर' असा केलाय. 'आसूड यात्रा' अहमदनगरमध्ये दाखल झालीय... या दरम्यान कडू यांनी 'सचिनचे रन तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेच मोजतात... पण, शेतकरी जे आयुष्यभर रन बनवतात ते मोजणारं कुणीच नाही' असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाकडे लक्ष वेधलं.
इतक्यावरच न थांबता कडू यांनी पुढे म्हटलं... 'सचिनचे रन्स मोजण्याची आवश्यकता नाही... ते कबूतर जिवंत आहे की मेलंय याचा काय फरक पडतो? नका बनवू रन, आम्हाला त्याच्याशी काय घेणं - देणं? त्याला एव्हढं डोक्यावर बसवून ठेवलंय की असं वाटतं तो पाकिस्तानच जिंकून आलाय.... पाहिलं तर इथून छक्के आणि चौके ठोकतो... ते तर कुणीही करेल'.
बच्चू कडू यांची वादग्रस्त वक्तव्य काही थांबण्याचं नाव घेत नाहीत... याआधीही त्यांनी 'हेमामालिनी रोज दारू पितात, म्हणून त्यांनी काय आत्महत्या केली का?' असं वक्तव्य नांदेडमध्ये केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती.