पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळात मनसेच्या युवक आघाडीनं वेगळं आंदोलन केलं. शिक्षण मंडळीतील संगणकाची सत्यनारायण पूजा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षण मंडळाने तीन वर्षांपूर्वी साधारण दोन हजार संगणकांची खरेदी केली. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे संगणक खरेदी करण्यात आले. मात्र , घेतल्यापासून  म्हणजे तीन वर्षांपासून हे संगणक धूळ खात पडून आहेत. कारण या संगणकावर प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्तीचा करण्यात  आलेली नाही. 


शिक्षण मंडळाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी मनसेनं हे आंदोलन केल. धूळ खात पडलेल्या या संगणकांची बातमी काही दिवसांपूर्वी झी २४ तासाने प्रसिद्ध केली होती. त्यांनतर मनसेने हे आंदोलन केलं.