पुणे : सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचार करतायत. पुण्यातही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार रंगलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच मनसेच्या नगरसेविकेच्या घरी आनंदाची बातमी आलीये. मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील यांना रणधुमाळीतच अपत्यप्राप्ती झालीये. 


विद्यमान नगरसेविका रुपाली पाटील यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवतायत. या निवडणुकीच्या रणधुमाळीतच त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झालाय. 


येत्या २१ फेब्रुवारीला पुणे महापालिकेसाठी मतदान होतंय तर २३ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.