ठाणे : मनसेच्या दहीहंडीत कोर्टाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन झालं. जय जवान पथकानं नऊ थर लावून सलामी दिली. तर आम्ही कोपरीकर या मंडळाने आठ थर लावले. यामध्ये सर्वात शेवटच्या थराला बालगोविंदाचा समावेश होता.


शिवतेज मंडळाच्या महिलांनी लावलेल्या दहिहंडीतही बालगोविंदा पाहायला मिळाले. पोलिसांनी सर्व दहीहंड्यांचं व्हिडिओ शुटिंग सुरू केलंय. त्यामुळं नियम मोडणा-या गोविंदा पथकांवर आणि आयोजकांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलंय.