शिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा
शिवजयंतीसाठी मनसेनं नवा झेंडा बनवला आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेटचं नाव या झेंड्यावर लिहिण्यात आलं आहे.
मुंबई: शिवजयंतीसाठी मनसेनं नवा झेंडा बनवला आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेटचं नाव या झेंड्यावर लिहिण्यात आलं आहे. खास शिवजयंतीसाठी असलेला मनसेचा हा झेंडा भगव्या रंगाचा आहे.
शिवजयंतीच्या दिवशी हा झेंडा घरांवर, मिरवणुकीत डौलानं फडकवा असं आवाहन राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
शिवजयंती हा काही बर्थ डे नसून हा मराठी अस्मितेचा सण आहे. त्यामुळे तो इंग्रजी कॅलेंडरनुसार नाही तर तिथीनुसार साजरा व्हायला पाहिजे असंही राज ठाकरे म्हणालेत. 26 मार्चला तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती आहे.
मनसेनं खास शिवजयंतीसाठी हा झेंडा तयार केला आहे, इतर दिवशी मात्र पक्षाचा जुना झेंडाच ओळख असेल. मनसेचा ठाण्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी शिवजयंतीसाठीच्या या खास झेंड्याचं अनावरण केलं.