`मोदींनी प्रत्येकाच्या जनधन खात्यात पाच हजार जमा केले`
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.
जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या लक्ष्मी दर्शनाच्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. नरेंद्र मोदींनी जनधन खाती उघडल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात पाच हजार रुपये जमा केलेत असा दावा दानवेंनी केला आहे. जालन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाऊन हॉल सभागृहात आयोजीत प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.