पुणे : पुण्यातील स्मार्टसिटी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला एक चिमुकली पाहूणी आवर्जून आली. पंतप्रधानांनीही तिच्याशी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल दहा मिनिटं गप्पा मारल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैशाली यादव असं या चिमुकलीचं नाव. आपल्या ह्रदयाच्या ऑपरेशनकरीता मदतीसाठी या चिमुकलीनं पंतप्रधानांना पत्र पाठवलं होतं. पंतप्रधान कार्यालयानेही तिच्या या पत्राची दखल घेतली आणि तात्काळ सूत्रे हलली. तातडीने वैशालीचे ऑपरेशन करण्यात आले. 


त्यानंतर वैशालीने पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर पुण्यात तिची इच्छा पूर्ण झाली. यावेळी मोदींनी तिची विचारपूस केली. चक्क मराठीत तिला बरी आहेस ना असं विचारलं. तसेच मोठेपणी कोण होणार या मोदींच्या प्रश्नावर वैशालीने पोलीस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच मला नेहमी पत्र पाठवत जा असेही सांगितले.