मालेगाव : मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाची धिंड काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात मालेगावमध्ये हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे या प्रकारानंतर तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या तरुणीची धिंड काढल्याचं सांगितलं जातयं तिनं किंवा तिच्या कुटुंबियांनी छेडछाडीची कुठलीही तक्रार पोलिसांत केली नाहीये. या तरुणावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. 


हा तरुण गावात सौंदर्य प्रसाधनांचं दुकान चालवायचा. मंगळवारी एक मुलगी दुकानात आली पण या तरुणानं तिची छेड काढल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी त्याला बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता तरुणाला अर्धनग्न केलं. तोंडाला काळं फासलं गळ्याच चपलांची माळ घातली आणि बँडबाजासह गावातून त्यांची धिंड काढली. तब्बल दोन तास हा सारा प्रकरा सुरू होता. 


तरुणाच्या वृद्ध आई वडिलांनी माफी मागून याचना करून हा सारा प्रकार कसाबसा थांबवला. या तरुणाला मारहाण करत जमावानं अर्धापूर पोलीस ठाण्यात नेलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर तरुणानं आई वडिलांसह गाव सोडलं. तीन दिवसांनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान घटनेनंतर तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय.