पुणे : वेगाने मार्गक्रमण करणार मान्सून प्रगती करताना दिसत नाहीय. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सूनच्या स्थितीत कोणतीही प्रगती दिसत नसल्याने, तुर्तास शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, यामुळे दुबार पेरणी टाळता येऊ शकते, असं पुण्याच्या हवामान विभागाने म्हटले आहे.


राज्यात कोकण, मराठवाड्याचे काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला असला, तरी विदर्भ आणि खानदेश अजूनही कोरडाच आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे, खऱ्या अर्थाने हा दुष्काळात तेरावा महिना आहे.


मान्सूनच्या प्रगतीचे पुढील संकेत येईपर्यंत, पेरणी न करणे सध्या योग्य राहिल असं सांगण्यात येत आहे.