पुणे : राजकीय पक्षांनी उमेदवारी वाटपात घातलेल्या घोळामुळे आणि उमेदवारांकडून राहिलेल्या काही त्रुटींमुळे पुण्यातल्या साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेयत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटेपर्यंत या अर्जांची छाननी सुरू होती. त्यात अनेक महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं त्यांना आता घरीच बसावं लागणारंय. तर अनेकांना पक्षाच्या अधिकृत चिन्हाऐवजी अपक्ष लढावं लागणारयं. महापालिका निवडणुकीत उमेदवारीच्या बाबतीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ झालाय. याचा परिणाम निवडणुकीतील समीकरणांवर निश्चितपणे होणार आहे. 


प्रभाग क्रमांक सातमधून राष्ट्रवादीनं उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपकडून रेश्मा भोसले यांनाही अपक्ष लढावं लागणारयं. या ठिकाणी आधी सतीश बहीरट आणि त्यानंतर रेश्मा भोसले यांना भाजपं एबी फॉर्म दिले होते. 


सुनावणीनंतर निवडणूक आयोगानं दोघांचेही कमळ चिन्ह गोठवलेय. त्यामुळं दोघांना अपक्ष लढावं लागणारय. तर सोमवार पेठ प्रभागात काँग्रेसनं 2 जागांसाठी 4 उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. मनसे सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या रवी धंगेकरांनाही आता अपक्ष लढावं लागणारय. वानवडीत कांग्रेस नगरसेवक अभिजीत शिवरकरांचा अर्ज बाद झाला. 


काँग्रेसच्या आणखी 5 ते 6 उमेजवारांचे अर्ज बाद झालेयत. येरवडा वडगाव शेरीतल्या सेना आणि मनसेच्या उमेदवारांचेही अर्ज बाद झालेयत. भाजपनं एकाच जागेसाठी दोघांना एबी फॉर्म दिल्याचा फटका आरपीआयच्या उमेदवारांना बसलाय.