रत्नागिरी : लोकप्रतिनिधींच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीमध्ये उघडकीस आलाय. भाजपाचे राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी संतोष नारायणकर याला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय संचेती यांच्या नावाचे बनावट पत्र तयार करुन रत्नागिरीतल्या जिल्हा नियोजन मंडळाला दहा कामे सुचवण्यात आली होती. ई-मेलच्या माध्यमातून खासदारांचे लेटर हेड वापरून हि कामे सुचवली गेली होती. कामांना मंजुरी देत यासाठी खासदार निधीतून लागणाऱ्या पैशाचा विषय ज्यावेळी पुढे आला. त्यावेळी हा सारा बनाव उघड झाला. स्वतः खासदार संचेती यांनी अशी कुठलीच कामं जिल्हा नियोजनला सुचवली नसल्याचा खुलासा रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर हा बनाव उघड झाला.


मोबाईल लोकेशनवरुन अखेर रत्नागिरी पोलिसांनी संतोष नारायणकर याच्या मुसक्या राजस्थान येथून आवळल्या. विशेष म्हणजे 12 वी पास असलेल्या नारायणकर यापूर्वीही राजीव शुक्लांच्या नावाचा वापर करून फसवणूक केली होती. 2016मध्ये क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यानंतर कृष्णा हेगडे यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक केल्याचा प्रयत्न केला होता. संतोष नारायणकर हा मूळचा बीडचा रहिवासी आहे.