मुंबई: इंटरनेटवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या जाहिरातींवर कारवाई करा, तसंच या वेबसाईटही बंद करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर वेश्याव्यवसाय चालतो, अशा वेबसाईटवर फोननंबरही दिले असतात असा दावा याचिकाकर्ते अली अहमद सिद्दीकी यांनी केला होता.


त्यावर सुनावणी करताना अशा जाहिराती आणि वेबसाईट बंद करा, सायबर विभागाची मदत घ्या आणि संबंधितांना अटक करा असे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिले.