पुणे : मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाकसई गावाजवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि ट्रेलरवर अपघात झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एक्स्प्रेवर लांबच रांग रांगा लागल्या असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलरवर जोरात आदळल्याने हा अपघात झाला. अपघतात टेम्पो चालक केबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. 


वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या तीन किमीपर्यंत रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. मुंबईकडे जाणारी वाहतूक होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दूग्ध व्यवसायिक यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला.