मालेगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध जोरदार  मोहीम उघडली आहे. माजी महापौरांसह पाच विद्यमान व चार माजी नगरसेवकांना एक महिन्यासाठी मालेगाव शहर आणि तालुक्यातून  हद्दपार केल्याची कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारवाईचा  सर्वच राजकीय  पक्षांनी धसका घेतला. मालेगांव  शहर  जिल्ह्यातील अतिसंवेदन शहर आहे. २४ मे  रोजी होऊ घातलेल्या मालेगाव  महापालिकेच्या निवडणुकीत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या  गुन्हेगारांना पोलिसांनी रडारवर घेतले आहे. तर राजकीय मस्तीच्या जोरावर कायदा हातात घेणाऱ्या सात विद्यमान व तीन  माजी नगरसेवकांना पोलिसांनी कारवाईचा झटका दिला आहे. 


६१ गुन्हेगारांचे  हद्दपारीची प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यातील ३६ जणांचे प्रस्ताव  मंजूर झाल्याने त्यांना निवडणूक काळात महिनाभर शहर व तालुक्यातून  हद्दपार करण्यात आले. हद्दपारीची कारवाई करतांना  गुन्हेगारी  हा एकमेव निकष ठेवल्याने  हद्दपारीची फास  राजकीय नेत्यांच्या भोवतीही आवळला गेला आहे.