यवतमाळ : नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करावी, अशी मागणी पराभूत उमेदवारांसह सर्व राजकीय पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगर परिषदेसाठी मतदानानंतर झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत प्रचंड घोळ झाल्याच्या तक्रारी घेऊन पराभूत उमेदवारांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. मतमोजणीत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला असून निवडणूक विभागाच्या यंत्रणेने गोंधळ केला. त्यामुळे यवतमाळ नगर परिषद नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करावी, अशी मागणी पराभूत उमेदवारांसह सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


मतमोजणी प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल केले. मतमोजणी दरम्यान प्रचंड गोंधळाची स्थिती होती, मतमोजणीपूर्वी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या नाही. सर्व ईव्हीएम मशीनची आकडेवारी मिळाली नाही. मतमोजणी वेळी दिलेली आकडेवारी आणि त्यानंतर जाहीर निकालांमध्ये प्रचंड तफावत होती. 


६ प्रभागात फेरमतमोजणी झाली आणि त्यात उलटफेर झाल्याने शंका निर्माण झाल्या. मात्र त्यानंतर अनेकांचे आक्षेप स्वीकारण्यात आले नाही. असे आरोप करीत या पराभूत उमेदवार तसंच त्यांच्या समर्थकांनी फेरमतमोजणी करण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणी न्यायालयात जाण्याचे प्रशासनाने सांगितल्याचे या उमेदवारांचे म्हणणे आहे.