प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून
नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजीलाल पेठ येथे ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला... पंकज पाटील असे मृतक तरुणाचे नाव असून तो ऑटोचालक होता...
जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजीलाल पेठ येथे ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला... पंकज पाटील असे मृतक तरुणाचे नाव असून तो ऑटोचालक होता...
तर मुख्य आरोपीचे नाव बंटी सुखदेवे असे आहे.. मृतक व आरोपी हे दोघेही एकाच वस्तीत राहत होते.. आरोपीच्या विवाहित बहिणीशी मृतक पंकज पाटील याचे प्रेमसंमंध होते... मात्र विवाहानंतरही दोघातील संबंध सुरुच असल्याचा रागावरुन आरोपी व मृतक यांच्यात मंगळवारी रात्री मारहाण झाली.
आरोपी बंटीने आपल्या ४ ते ५ सहकाऱ्यांच्या मदतीने पंकज वर धारदार शस्त्राने वार केले.. जखमी पंकजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याच्या मध्यरात्री मृत्यू झाला.
या घटनेत पंकजचा एक साथीदार देखील जखमी झाला आहे तर घटनेपासून आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.