पिंपरीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या
पिंपरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या करण्यात आलीये. अंतरा दास असं या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.
पिंपरी : पिंपरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या करण्यात आलीये. अंतरा दास असं या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.
अंतरा पिंपरीतील आकुर्डी येथे राहत होती. ती आयटी कंपनीत नोकरीला होती. गेल्या काही दिवसांपासून काही तरुण सतत तिची छेड काढायचे. शनिवारी रात्री बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी तिच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अंतराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.