नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद निकाल
नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे निकाल जवळ-जवळ घोषित झाले आहेत, बहुतेक ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले आहे. बातमीच्या खाली पाहा कोणत्या नगपरिषदेवर कुणाचा झेंडा लागला आहे.
नागपूर : नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे निकाल जवळ-जवळ घोषित झाले आहेत, बहुतेक ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले आहे. बातमीच्या खाली पाहा कोणत्या नगपरिषदेवर कुणाचा झेंडा लागला आहे.
विदर्भातील नागपूर, गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. तर मोहपामध्ये काँग्रेसच्या शोभा काऊटकर निवडून आल्या आहेत.
काटोलमध्ये भाजपला विदर्भ माझा पक्षाने धक्का दिला आहे. कारण अभिजित देशमुख आणि विदर्भ माझा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानाच्या दिवशी चांगलीच जुंपली होती. मात्र अखेर काटोलमध्ये विदर्भ माझा पक्षाच्या उमेदवार वैशाली ठाकूर निवडून आल्या आहेत.
नागपूर जिल्हा
कामठी - नगराध्यक्षपदी
उमरेड - नगराध्यक्षपदी विजयालक्ष्मी भदोरिया (भाजप)
काटोल - नगराध्यक्षपदी वैशाली ठाकूर ( विदर्भ माझा)
कळमेश्वर- नगराध्यक्षपदी स्मृती इखार
रामटेक- नगराध्यक्षपदी दिलीप देशमुख (भाजप)
नरखेड- नगराध्यक्षपदी अभिजित गुप्ता (नगरविकास आघाडी)
खापा- नगराध्यक्षपदी प्रियंका मोहिते (भाजप)
सावनेर- नगराध्यक्षपदी रेखा मोवाडे (भाजप)
मोहपा - नगराध्यक्षपदी शोभा काऊटकर (काँग्रेस)
गोंदिया जिल्हा
गोंदिया- नगराध्यक्षपदी अशोक इंगळे (भाजप)
तिरोडा- नगराध्यक्षपदी सोनाली देशपांडे (भाजपा)