नागपूर बनणार देशातला पहिला डिजिटल जिल्हा
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ग्रामपंचायत डिजिटल रुपात जोडण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झाला. या अंतर्गत नागपूर जिल्ह्यामधल्या 500 ग्रामपंचायती डिजिटली कनेक्ट करण्यात आल्या. तसंच राईट टू सर्विस अंतर्गत 50 सेवांचाही लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला.
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ग्रामपंचायत डिजिटल रुपात जोडण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झाला. या अंतर्गत नागपूर जिल्ह्यामधल्या 500 ग्रामपंचायती डिजिटली कनेक्ट करण्यात आल्या. तसंच राईट टू सर्विस अंतर्गत 50 सेवांचाही लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला.
येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण नागपूर जिल्हा डिजिटली कनेक्ट केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अशा प्रकारे डिजिटल होणारा नागपूर हा देशातला आणि राज्यातला पहिला जिल्हा ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डिसेंबर 2018 पर्यंत राज्यभरातल्या सर्व 29 हजार ग्रामपंचायती डिजिटल नेटवर्कनं जोडल्या जाणार आहेत.