नागपूर : येथील नितिका केमिकल फॅक्टरीत आग लागली. या आगीत 18 जण जखमी झाले. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. कंपनीत असलेल्या बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक कंपनीतून मोठा आवज आल्याने परिसरातील घरांना हादरे बसले. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी घराबाहेर धाव घेतली असता कंपनीला आग लागल्याचे चित्र त्यांच्या निदर्शनात आले. 


अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ रवाना करण्यात आल्या आणि त्यानंतर ही आग आटोक्यात आली. आगीवर यंत्रण मिळविण्यासाठी ज्या अडचणी आल्या. त्याला फॅक्ट्रीनं अतिक्रमित करुन अधिकचे केलेलं बांधकाम असल्याचा आरोप आता होत आहे.


फॅक्ट्रीतील जखमींना शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवळपास दहा ते पंधरा लोकांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.