नागपूर : नागपूरच्या सुयश कॉन्वेटं शाळेतील विद्यार्थीनींना त्याच शाळेतील डान्स टीचरकडून मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या वर्षिक स्नेह स्नेहनेलनासाठी मुलींना नृत्याचे प्रशिक्षण देणा-या शिक्षकानेच किमान ३ विद्यार्थीनींना नृत्य शिक्षकाने मारहाण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनिष राऊत असं या शिक्षकांचं नावं आहे. लोखंडी सळीने विद्यार्थीनींना मारहण केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेची तक्रार मुलींच्या पालकांनी केल्यावर नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी मनिष राऊतला अटक केली आहे.


मुख्याध्यापक अनुराग पांडे यांनाही ताब्यात घेतले  आहे.  शाळेला २ दिवस सुट्टी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे. पालकांनी या सर्व प्रकरणाची चौकशी कऱण्याची मागणी केली आहे. शाळा प्रशासनाने मुख्याध्यापक अनुराग पांडे बडतर्फ केलं आहे.