नागपुरातील बलात्कार पीडित मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
आमदार निवासमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने प्रचंड नैराश्यातून काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या यांनी ही माहिती दिली.
नागपूर : आमदार निवासमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने प्रचंड नैराश्यातून काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या यांनी ही माहिती दिली.
पीडित मुलगी प्रचंड नैराश्यात होती. आरोपीच्या ओळखीच्या लोकांनी पीडित कुटुंबावर दबाव आणला. हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोप होत आहे.
दरम्यान, आमदार निवासात महिला सुरक्षितता वाढवण्याची गरज आहे. तिथे अनेक उणिवा आहेत. नागपूर पोलीस या प्रकरणात संवेदनशील वाटत नाही. अशा प्रकरनाबद्दल प्रशिक्षण देण्याची गरज, असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.