नागपूर : एफएम रेडीयोच्या लाइव शो दरम्यान रेडिओ जॉकीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. शुभम केचे असं मृत्यू झालेल्या आरजेचं नाव आहे. शुभम नागपूरच्या रेडियो मिर्ची मध्ये आरजे म्हणून गेल्या दोन वर्षापासून काम करत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीप्रमाणे आज सकाळी सुमारे साडे नऊच्या सुमारास 'हाय नागपूर' या शो दरम्यान त्याचा छातीत अचानक दुखू लागल्यामुळे तो वॉशरूम मध्ये गेला मात्र वॉशरूम मधून बाहेर पडताच तो जमिनीवर कोसळला.


शुभमची स्थिती पाहिल्यावर ऑफिसमधील सुरक्षा रक्षकांनी त्याला लगेच नजीकच्या खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेले मात्र हॉस्पिटल मध्ये पोहचल्यावर डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले. हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने शुभमचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. २२ वर्षीय शुभम च्या घरी आई व एक लहान बहिण असून शुभमच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं.