राणेंचं भाजप प्रवेशाबाबतचं गूढ आणखी गहिरं
या कार्यक्रमातील राजकीय चिमटे कोणी गांभीर्याने घेवू नयेत असंही राणेंनी आवर्जुन सांगितलं.
सिंधुदुर्ग : आपण बोलायला घाबरत नाही योग्य वेळ आली की नक्की बोलेनं, असं म्हणत नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाबाबतचं गूढ आणखीनंच गहिरं केलं आहे. या कार्यक्रमातील राजकीय चिमटे कोणी गांभीर्याने घेवू नयेत असंही राणेंनी आवर्जुन सांगितलं.
गेले काही दिवस पक्षांतराच्या चर्चेमुळे सतत चर्चेत राहिलेल्या नारायण राणेंनी रविवारची संध्याकाळ आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या साथीने स्नेहसंमेलनात एंजॉय केली. यावेळी जिल्ह्याभरातून आलेल्या नारायण राणेंच्या समर्थकांनी या स्नेहसंमेलनात आपले विविध कलागुण सादर केले.
जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुंदन बांदीवडेकर आणि पंचायत समितीचे माजी सभापती संतोष कानडे यांनी सादर केलेल्या भविष्यवाणीच्या स्कीटने जिल्ह्यात होणा-या नव्या राजकीय बदलाची जणू भविष्यवाणीच केली. दरम्यान या कार्यक्रमांच्या अखेरीस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना मार्गदशन केलं.