पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र  तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) तावडेला काल मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आज त्याला नवी मुंबईच्या सीबीआय कार्यालयातून पुण्यात आणण्यात आले. येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. 


वीरेंद्र तावडेच्या बचावासाठी सनातन संस्थेच्या वकिलांची मोठी फौज न्यायालयात उपस्थित होती. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी वीरेंद्र तावडे हा २००९ पासून फरार असलेला सनातनचा साधक सारंग अकोलकर यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. 


डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलशी सार्धम्य असणारी मोटारसायकल वीरेंद्र तावडे याच्याकडे सीबीआयला सापडली होती. तसेच तावडेने डॉ. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी कोल्हापुरात त्यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केल्याचेही तपासात उघड झाल्याचे सीबीआयने न्यायालयात मांडले.