ओरोस : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ दिसून येत आहे. ही क्रेज आता सिंधुदुर्गातही दिसून येणार आहे. राणेंच्या वॅक्स म्युझियममध्ये चक्क मोदी दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये काँग्रेसचे आमदार नितेश राणेंच्या संकल्पनेतलं वॅक्स म्युझियम आकाराला येण्यास सुरूवात झाली आहे. पण सध्या या म्युझियममध्ये फक्त नरेंद्र मोदींचाच पुतळा आलाय. 


काँग्रेसमधल्या दिवंगत नेत्यांमध्ये इंदिरा आणि राजीव गांधींचे पुतळे लागले आहेत. या सगळ्या आजी माजी दिग्गजांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा या वॅक्स म्युझियममध्ये लागल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.