नाशिक : दिवाळी सणाच्या पार्शभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना १४ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील वर्षी १३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करणायत आलं होतं. त्यात आता ५०० रुपये भर घालण्यात आलीय. त्याचबरोबार महापलिकेच्या सर्व स्थायी कर्मचा-यांचा पाच लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यासाठी एक हजार रुपये कर्मचा-यांना द्यायचे तर एक हजार रुपये महापालिका प्रशासन अदा करणार आहे. सात हजाराहून अधिक कर्मचा-यांना या घोषणेचा लाभ होणार असल्यानं कर्मचा-यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.