नाशिक : एका नाशिक पोलिसांने काठीने एका महविद्यालयीन विद्यार्थ्याला जबर मारहाण केली आहे. मारहाणीमागे कोणतंही कारण नसल्याचं तरी सध्या दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगापूर पोलीस ठाण्याचा एका हवालदाराने वैभव क्षीरसागर या तरुणाला महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावारच बेदम मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.  


रस्ता ओलंडत असताना अचानक बीट मार्शल असणाऱ्या हवालदाराने मागून येवून वैभववर लाठीहल्ला केला.  का मारातायेत?, असा प्रश्न विचरला असता हवालदाराने काठी तुटे, अंगावर वळ उमटे पर्यंत मारहाण केल्याचा या तरुणाचा आरोप आहे.  


जखमी युवकाला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करणायत आलाय. यात दोषी हवालदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्याकडून केली जात आहे.