पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे आणि नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यापाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषद आणि महापलिका दोघांनामध्ये शेतकरी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत. त्यामुळे केंद्र आणि सरकारमध्ये असलेल्या भाजपाला याचा फटका बसतोय. हे लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकाऱयांनी हा निर्णय घेतलाय. शिवाय राजकीय कुरघोडीचा प्रयत्न या निमित्तानं दिसत आहे. 


शेतमालाला भाव नाही. कांद्याचा दर घसरल्यानं,  नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकऱयांची नाराजी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना या नाराजीची वाटेकरी होऊ इच्छित नसल्यानं स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.