नाशिक : नाशिकच्या सट्टेबाजारात शिवसेनेने चांगलाच भाव खालला आहे. शिवसेनेचा दर १ रूपया १० पैसे, तर भाजपचा १ रूपया ८० पैसे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचा दर शिवसेनेपेक्षा जास्त असला, तरी ४ दिवसापूर्वी हा दर ३ रूपये होता. तो आता खाली आला आहे, तर शिवसेनेचा वाढला आहे. शिवसेना सर्वात मोठा पक्ष नाशिक महापालिकेत ठरेल अशी अपेक्षा नाशिककरांना आहे.


नाशिकमधून क्रिकेटसाठी देखील कोट्यवधी रूपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. त्या मानाने निवडणुकीत सट्टा लावण्याचं प्रमाण कमी असल्याचं सांगण्यात येत आहे.