नाशिक : मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मंदिराच्या दानपेटीतील पंचाहत्तर लाखाहून अधिक रक्कम आता चलनात आली आहे. प्रमुख तीन मंदिरात आयकर विभागाच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली दान पेट्या उघडण्यात आल्या. यातून लाखो रुपयांची नाणी, सुट्टे रुपये बँकांमध्ये भरण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या एकट्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पन्नास लाखाहून अधिक तर कपालेश्वर मंदिरातून 1,36,980 रुपये आणि काळाराम मंदिरातून 1,74,00 रुपयांची रक्कम बँकामध्ये भरण्यात आली. यात बहुतांशी पन्नास, शंभर आणि दहाच्या नोटांचा अधिक भरणा होता. यामुळे नाशिककरांना आता सुटे मिळण्यास मदत झाली आहे.