नाशिकमध्ये प्रभाग क्र.३ आणि ३० वरील मतमोजणी थांबवली
उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे, मतदानापेक्षा अधिकचे आकडे आल्याचा आरोप होत आहे.
नाशिक : प्रभाग क्रमांक ३ आणि ३० वर मतमोजणी थांबवली आहे, भाजप सोडून इतर उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे, मतदानापेक्षा अधिकचे आकडे आल्याचा आरोप होत आहे.
- नाशिक मनपा प्रभाग 3 मधील मतमोजणी थांबवली
-मतदान यंत्र चुकीचे आकडेवारी देत असल्याचा सर्व उमेदवारांचा आरोप
- मतमोजनीचे काम थांबवले
-मोठ्या प्रमाणावर गोंधळ
- या प्रभागात एकूण मतदान 38973 असून 23000 इतके मतदान झालेले असताना आज 27000 इतके मतदान झाल्याचं आरोप उमेदवार करताहेत
- दोन दिवसात अतिरिक्त 4000 हजार मतदान अधिक झाल्याचा आरोपांमुळे मतमोजणी प्रक्रिया थांबवली
प्रभाग ३० मध्येही मतमोजणी थांबवली
प्रभाग 30 भाजप सोडून इतर सर्व उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार.
5 ते 6 मशीन वीना सील असल्याचा आरोप
केम्ब्रिज शाळा बूथ 34 चे मशीन ख़राब झाल्याने 51 नंबरचे मशीन वापरले,असे अधिकार्यांचे स्पष्टीकरण, पण तसे करताना मतदान प्रतिनिधींची सही नाही असा आक्षेप, न्यायालयात जाण्याचा निर्णय