नवी मुंबईतील डी.वाय.पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द
डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हॉस्पिटलनं परवान्याचं नुतनीकरण केलं नसल्यानं, ही कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई : डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हॉस्पिटलनं परवान्याचं नुतनीकरण केलं नसल्यानं, ही कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनानं ही धडक कारवाई केली आहे.
तसंच या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात डी. वाय. पाटील हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.