नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे २०१७-१८ वर्षासाठीचे बजेट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समिती समोर केले. ९०० कोटी रूपये जास्तीचे बजेट त्यांनी सादर केले. मात्र, बजेटवर त्यांना बोलू दिले नसल्याने तुकाराम मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सभापतींनी बजेटवर आयुक्त मुंढेंना स्थायी समितीमध्ये निवेदन करू दिले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई महानगरपालिकेचे २०१७-१८ वर्षासाठीचे बजेट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीसमोर सादर केले. गेल्या वर्षी पेक्षा  ९०० कोटी रूपये जास्तीचे बजेट यावेळेला आयुक्तांकडून मांडण्यात आले आहे. २९९९८. ४८ कोटी बजेट सादर करण्यात आले आहे. यामध्ये अनेक योजनांचा समावेश असल्याने याची माहिती सदस्यांना देण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभापती शिवराम पाटील यांना केली. मात्र याला नकार देत सदरचे बजेट सदस्यांनी वाचल्यानंतर पुढील २२ तारखेच्या बैठकीत चर्चा करू, असे सांगत सभा तहकूब केली. 


दरम्यान यावर महापौर सुधाकर सोनवणे यांना विचारले असता त्यांनी आयुक्त मुंढे हे आत्तापर्यंत स्थायी समितीमध्ये बसून सदस्यांनी मांडलेले पश्न समजून घेत नव्हते. मग आम्ही का त्यांचे ऐकायचे, असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे नवी मुंबई पालिकेत लोकप्रतिनी विरुध्द मुंढे असा वाद पाहायला मिळत आहे.