नवापूर बस दुर्घटना प्रकरण, बस चालक निलंबित
नवापूर बस दुर्घटना प्रकरणातील बस चालक राजेंद्र साबळे यांना निलंबित करण्यात आलेय.
नंदुरबार : नवापूर बस दुर्घटना प्रकरणातील बस चालक राजेंद्र साबळे यांना निलंबित करण्यात आलेय.
बेजबाबदारपणे वाहन चालविल्या प्रकरणी साबळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
जालना येथून सुरतच्या दिशेने निघालेली बस नवापूर येथे पुरात अडकली. स्थानिक तसेच पोलिसांच्या तात्काळ सहकार्याने बसमधील १७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले.
पहाटे पाच वाजेच्या सुमारास नदीला पुर आल्याने पुलावरुन पाणी वाहत होतं. पुलावर किती पाणी आहे याचा अंदाज न आल्याने बस पुलाच्या प्रवाहातच बंद झाली. पोलिसांच्या आणि स्थानिकांच्या मदतीमुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.