पुणे : पुण्यातली सॉफ्टवेअर इंजीनिअर नयना पुजारी हत्याकांडाप्रकरणी चारही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. योगेश कदम, विश्वास कदम, महेश ठाकूर यांच्यावर अपहरण, बलात्कार, दरोडा आणि हत्या असे चारही आरोप सिद्ध झाले आहेत. याप्रकरणी चौथा आरोपी राजेश चौधरी माफीचा साक्षीदार होता.  


या चौघांनी 8 ऑक्टोबर 2009 मध्ये ३२ वर्षीय नयना पुजारीचं अपहरण केलं होतं. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं नयाना गाडी बसून तिला अज्ञात स्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह राजगुरूनगरमध्ये सापडला होता.