कैलास पुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड : निवडणुका जिंकायच्या म्हटलं तर साम दाम दंड भेद नीती काहीही वापरा तुम्हाला ते माफ असतं...! पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांमुळं त्याची जाणीव आता सर्वाना होऊ लागलीय....! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत...ललिता पवार, शक्ती कपूर अशा कलाकारांच्या उपमा एकमेकांना देत असताना या आरोप प्रत्यारोपांनी आता गंभीर वळण घ्यायला सुरुवात केलीय...! 


राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निनावी फोन करून पक्षात या नाही तर चौकशी लाऊ अशी धमकी देणारे फोन रात्री अपरात्री येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय.. किती ही प्रयत्न केला तरी राष्ट्रवादीची सत्ता जाणार नाही हे लक्षात आल्याने ही विरोधकांनी हीन पातळी गाठल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय...! 


दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीच्या आरोपांचे खंडन केलंय.. मुळात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केलाय आणि त्यामुळे त्यांना तसे भास होत असतील असा टोला भाजपने लागवालाय.


आता या आरोप प्रत्यारोपात तथ्य किती हे दोन पक्षच जाणोत...पण ही तर सुरुवात आहे... निवडणुकांमध्ये या ही पुढचे आरोप प्रत्यारोप होणार आणि साम दाम दंड भेद नीती या सर्वांचा वापर खुलेआम होणार यात शंका नाही.