लातूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस-भाजप नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा लातूरच्या आंबेडकर चौकात पार पडली. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागाईमुळे, मोदी सरकारच्या अजब निर्णयामुळे जिथे गरिबांचे खायचे वांदे आहेत तिथे शौचालायला कुठून जायचे असा सवाल करीत मुंडे यांनी मोदींच्या स्वच्छता अभियानाची खिल्लीही उडविली. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि तुमच्या आमच्या नशिबी दलिंद्र सरकार आल्याची कोपरखळी त्यांनी आपल्या खास शैलीत लगावली. दरम्यान, काँग्रेसकडून प्रस्ताव आला, तर आघाडी करू असंही धनंजय मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं.