पुणे : महापालिका निवडणुकीतल्या तिकिटाच्या बाजारात पुण्यानं आज अजब प्रकार अनुभवला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं आणि हे कळताच काही वेळातच त्यांनी भाजपचं तिकीट मिळवून अर्जही भरला. 


राष्ट्रवादीनं भोसलेंसह सतीश म्हस्के, विजया कापरे आणि शिवलाल भोसले या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. त्यापैकी शिवलाल भोसले शेवटच्या क्षणी शिवसेनेत गेले. तर पती राष्ट्रवादीचे आमदार असताना पक्षनिष्ठा गुंडाळून रेश्मा भोसलेंनी भाजपचं तिकीट मिळवून निवडणुकीची बस पकडली.