उपजिल्हाधिकारी मारहाण प्रकरणी आमदाराला अटक
सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केली होती, या प्रकरणी सुरेश लाड य़ांना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर : कर्जतचे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांना अटक करण्यात आली आहे. सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केली होती, या प्रकरणी सुरेश लाड य़ांना अटक करण्यात आली आहे.
सुरेश लाड यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, पण हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकारी अभय कलगुदर यांना मारहाण केल्याची दृश्य व्हॉटसअॅपवरही व्हायरल झाली होती, यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं.
असं सांगण्यात येतंय की, शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला देण्याच्या मुद्यावर उपजिल्हाधिकारी आणि आमदारात वाद झाला होता, यानंतर सुरेश लाड यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना मारहाण केली.
व्हिडीओत दिसतंय की आजूबाजूला अनेक लोक उभे आहेत, तर काही लोक त्यांना प्लिज सर प्लिज सर करून थांबवतायत.