पुणे : महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला इच्छूक उमेदवारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असला, तरी पिंपरी चिंचवड मध्ये मात्र उमेदवार राष्ट्रवादीलाच पसंती देतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातल्या १२८ जागांसाठी तब्बल ६५० इच्छूकांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचं स्पष्ट झालंय


नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपला मिळालेल्या यशामुळे मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाजपला पसंती मिळणार हे स्पष्ट होतं. 


पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण पुण्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी फारसं कोणी इच्छूक नसल्याचं स्पष्ट होतंय, असं असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र राष्ट्रवादीकडूनच उमेदवारीसाठी इच्छूकांची मोठी संख्या आहे. 


आतापर्यंत 128 जागांसाठी तब्बल 650 उमेदवारांचे अर्ज राष्ट्रवादीकडे जमा झालेत. 


राष्ट्रवादीला असलेल्या इच्छूकांच्या या प्रतिसादामुळे भारावलेल्या राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधलाय. 


पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. 


त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात म्हणावा तसा प्रतिसाद नसला तरी पिंपरी चिंचवडच्या प्रतिसादाने राष्ट्रवादी बळ मिळाल्याचं दिसून येतंय.